मुंबई – ‘बाहुबली’ला मिळालेल्या अफाट यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित “आरआरआर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसह आलिया भट्ट आणि अजय देवगण झळकणार आहेत.
हा एक बिग बजेट चित्रपट असून, नुकतंच या ‘आरआरआर’चा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एकाच वेळी अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ट्रेलर मध्ये दमदार ऍक्शन आणि ड्रामा असल्याचे दिसून येत आहे.
या चित्रपटाचे कथानक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू या तरुणांच्या जीवनात येणारे प्रसंग या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. अल्लुरी सीताराम यांच्या भूमिकेत राम चरण तर कोमाराम यांच्या भूमिकेत
ज्यूनियर एनटीआर दिसणार आहेत. तसेच सीता या भूमिकेत आलिया भट दिसणार आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलर पूर्वी प्रदर्शित झालेल्या “नाचो नाचो..’ आणि ‘जननी’ या गाण्यांना सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.