नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत कॉंग्रेसने सध्या 39 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजपने 26 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसने बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. परंतु कॉंग्रेसला भाजपकडून ऑपरेशन लोटसची भीती वाटत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसने आपल्या विजयी आमदारांना हिमाचल प्रदेशमधून राजस्थानला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कॉंग्रसचे प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे शिमल्याला रवाना झाले आहेत.
कॉंग्रेसला आपल्या आमदारांची घोडेबाजार होण्याची भीती आहे. परंतु हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस विजयी झाल्यास जनतेच्या हिताची सर्व कामे करु, असे कॉंग्रेसचे दिग्गज नेते राजीव शुक्ला म्हणाले आहेत. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली. हिमाचलमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला, असेही शुक्ला म्हणाले.