देऊळगावराजे येथील घटना
देऊळगावराजे – येथील एका खासगी शेततळ्यामध्ये बाप लेकाच्या शेतमजुरांच्या पाण्यात बुडवून मुत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मोहन जाधव (वय 50), किरण जाधव (दोघे रा. निंबूत, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, देऊळगावराजे (ता. दौंड) येथील शेतकरी संदीप ननावरे यांच्या शेतात हे दोन शेतमजूर काम करण्यासाठी आले होते.
शनिवारी दुपारी दोघे शेततळ्यावर मासे पकडण्यासाठी गेले असता वडील मोहन जाधव यांचा पाय घसरून ते पाण्यात पडल्यानंतर किरण त्यांना बाहेर काढण्यासाठी हात देत असताना तोही पाण्यात पडला. वडिलांना पोहता येत होते; परंतु मुलाला पोहता येत नसल्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या साथीत पाण्यात गटांगळ्या खाल्या, यातून बुडून त्यांचा मुत्यू झाला.
त्यानंतर दौंड पोलीस ठाण्याला देऊळगावराजेचे पोलीस पाटील सचिन पोळ यांनी खबर दिल्यानंतर पोलीस अधिकारी रमेश काळे आणि शिंदे हे घटनास्थळी आले व बाप-लेकाचा मृतदेह गोपाळ गिरमकर यांनी बाहेर काढले. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.