पिंपरी – पती पत्नीच्या भांडणात पतीने आपल्या पाच महिन्याच्या मुलीचा नाक तोंड दाबून खून केला. ही घटना शनिवारी (दि. ९) पहाटे बाधवन येथे घडली.
संगिता बाबुराव जाधव (वय ५ महिने, रा. बाधवन, पुणे) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबुराव याचे आपल्या पत्नीशी भांडण झाले. या रागातून त्याने पाच महिन्याच्या मुलीचे नाकतोंड दाबून खून केला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिकतपास करीत आहेत.