तापसी पन्नू ही बॉलीवूडमध्ये दाखल झालेल्या नव्या दमाच्या अभिनेत्रींपैकी एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली आहे. गतवर्षी “बदला’, “गेम ओव्हर’, “मिशन मंगल’ आणि “सांड की आँख’ या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन घडवले.
View this post on Instagram
When she said she wants her mark on it and she did it! #TP #MyBatMobile #HouseOnWheels
यंदाच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये तापसीचा “थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याखेरीज भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित “शाबाश मिथु’ या बायोपिकमध्येही ती झळकणार आहे.
“किस्सा ख्वाबों का’ या कार्यक्रमात बोलताना तापसीने आपल्या पूर्वायुष्यातील काही किस्से सांगितले. ती सांगते, करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी मॉडेलिंग करायचे. तेव्हा माझे वडील खूप अस्वस्थ होते.
View this post on Instagram
When she said she wants her mark on it and she did it! #TP #MyBatMobile #HouseOnWheels
अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी मी कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली आहे. असे असताना अचानक जेव्हा मी मॉडेलिंगची सुरुवात केली तेव्हा वडिलांची अक्षरशः झोप उडाली होती. पण इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षामध्ये मला परीक्षेत मिळालेले गुण, अभ्यासातील माझा समर्पण भाव पाहिला तेव्हा वडिलांनी तिला स्वातंत्र्य दिले. सिनेक्षेत्रातील पार्श्वभूमी नसतानाही या क्षेत्रात येऊन तापसीने कमावलेली लोकप्रियता पाहून आज तिचे वडील नक्कीच आनंदी झाले असतील!