चाकण, (वार्ताहर) – उन्हाळी बाजरीचे पीक यंदा जोमदार असून सध्या फुलोर्यात आले आहे. पिकाचे अपेक्षित उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकर्यांना असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
खेड तालुक्यात यावर्षी शेतकर्यांनी उन्हाळी बाजरीची पेरणी सुमारे 1519 हेक्टर क्षेत्रावर केली आहे. प्रामुख्याने 8203 , सरदार 2561 , हाय पर्ल 51 , अंकुर 045, सुजलाम 68 आदी जातीच्या उन्हाळी बाजरीचे बियाणे वापरण्यात आले आहे.
यंदा पावसाळ्यात निसर्गाचा लहरीपणा व पावसाचे हुलकावणी देण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकर्यांनी हमखास उत्पन्न मिळेल या अपेक्षेने उन्हाळी बाजारी ची पेरणी अधिक प्रमाणात केली आहे. ज्वारी पिकप्रमाणेच बाजरी पिकाचाही दुहेरी फायदा होतो.
धान्य व जनावरांसाठी चारा (सरमाड) असा दुहेरी फायदा शेतकर्यांना मिळतो. याशिवाय चांगल्या प्रतीची उन्हाळी बाजरी मिळते. त्यामुळे शेतकर्यांचा कल उन्हाळी बाजरी करण्याकडे वाढला आहे. त्यामुळे एकंदर उन्हाळ्यातील पिकात दुसर्या क्रमांकात बाजरीचे क्षेत्र आहे. आजमितीला बाजारात 30 ते 35 रुपये किलो असा बाजरीचा दर आहे.