बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह झाली आहे. उर्वशी जेवढी चांगली अभिनेत्री आहे तेवढीच ती उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे.
नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती शकीराच्या हिप्स डॉन्ट लाय (Hips Don’t Lie ) गाण्यावर Belly डान्स करताना दिसत आहे.
उर्वशीचा हा व्हिीडओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तिच्या मादक अदांवर चाहते घायाळ झालेले पाहायला मिळत आहेत. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
NAMASLAY 🖤🤍 . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love #UrvashiRautela
या व्हिडिओवर सध्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी तिनं काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती.
दरम्यान, उर्वशीने “सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून सनी देओलसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.यानंतर तिचा “हेट स्टोरी 4′ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
उर्वशीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लॉकडाऊनच्या आधी तिचं “एक डायमंड दा हार लेदे यार’ हे गाणे रिलीज झाले होते. तिच्या या गाण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. याशिवाय ती “पागलपंती’मध्येही झळकली होती.