नवी दिल्ली – भारताचा महान माजी कर्णधार एमएस धोनी आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशा परिस्थितीत चाहते धोनीचे वेगवेगळ्या प्रकारे अभिनंदन करत आहेत. धोनीच्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ जगभरातील चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएल 2023 मध्ये धोनीची क्रेझ पाहायला मिळाली होती. यंदाच्या धोनीच्या जन्मदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी एक भन्नाट कृती केली आहे.
धोनीच्या ४२व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हैदराबाद आणि आंध्र प्रदेशातील नंदीगामा येथे धोनीचे मोठे कट-आउट्स पाहायला मिळाले. हैदराबादमध्ये धोनीचा कटआउट 52 फूट उंच बनवण्यात आला आहे, तर नंदीगामाचा कटआउट 77 फूट उंच आहे. हैदराबादच्या कट आऊटमध्ये धोनी भारतीय जर्सीमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, माही सीएसके जर्सीमध्ये दिसत आहे.
Ms dhoni ❤🥵
52 feet cut out hyderabad
77 feet cut out in ap ( nandigama)Telugu MSD fans antarra babu ❤🔥#HBDMSDhoni #MSDhoni #MSDhoniTheUntoldStory pic.twitter.com/8a4sIQq12L
— Varanasi Chandu (@VaranasiChandu6) July 6, 2023
कटआउटवर दूध अर्पण केले
नंदीगामामध्ये धोनी कटआउटला दुग्धाभिषेक केल्याचा व्हिडिओही समोर आला होता. माही हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यापूर्वी त्याने भारताला कसोटीत नंबर वन बनवले. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
माही सर्वोत्तम फिनिशर आहे
धोनी हा क्रिकेटच्या इतिहासातील महान फिनिशर म्हणून ओळखला जातो. त्याने 2014 मध्ये कसोटीतून अचानक निवृत्ती घेतली, 2017 मध्ये त्याने T20 आणि शेवटी 2020 मध्ये ODI सह सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता तो फक्त आयपीएलमध्ये दिसतो. मात्र, माहीच्या फिटनेसवर अवलंबून धोनीला पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पाहण्याची अपेक्षा चाहते करू लागले आहेत.