नागपूर – ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते. त्या लग्नात सर्व पक्षातील नेते आणि अधिकारी देखील उपस्थित होते. ते मुस्लिम धर्माचे नाशिकचे धर्मगुरू शेर-ए-खातीम यांच्या पुतण्याच्या लग्नाला गेले होते. या लग्नाला गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री म्हणून गेले होते, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेर-ए-खातीम यांचा दाऊदशी काही संबंध नाही. ज्या मुलीशी शेर ए खातीम यांच्या पुतण्याचे लग्न झाले, त्यांचाही दाऊदसोबत कोणताही संबंध नाही. तथापि त्यावेळी माध्यमातून शेर-ए-खातीम यांचा संबंध आसल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी मी गृहमंत्री म्हणून 2018 चौकशी समिती नेमली होती आणि तत्कालीन डीसीपीच्या अंतर्गत चौकशी समिती नेमली होती.
या समितीने स्पष्टपणे अहवाल दिला होता. त्या अहवालात स्पष्ट सांगितले की, शेर ए खातीम यांचा दाऊदशी संबंध नाही. खरे म्हणजे आज उद्धव ठाकरे आल्यामुळे सभागृहात अशा प्रकारचे विषय़ आले असतील. खरे तर एखाद्या मंत्र्यावर कोणत्याही खातरजमा न करता आरोप लावतात आणि या प्रकरणाची चौकशी झालेली आहे.अशाच प्रकारची तडफड बडगुजर जेव्हा सलीम कुत्तासमोबत नाचताना तुम्ही का नाही दाखवली? कोणताही संबंध नाही. पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछुट आरोप केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. विरोधकांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे फडणवीस म्हणाले.