1 लाख 15 हजार 635 मजुरांना भोजन
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 159 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 260 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 487 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 43 हजार 835 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 15 हजार 635 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहिर केला आहे. लॉकडाऊनचे राज्यात तंतोतंत पालन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विविध उपाययोजना राबवित आहे. हे करीत असताना जिल्ह्यातील कोणीही नागरिक उपाशी राहणार नाही याकडेही प्रशासन विशेष लक्ष देत आहेत.