फेसबुकची आता डेटींग सेवा – शोधा तुमचा जोडीदार

वॉशिंग्टन – गुगलने तरुणांना नोकरी शोधून देण्याची योजना जाहीर केल्यानंतर आता फेसबुकही तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार शोधण्यासाठी मदत करणार आहे.जगभरातील 80 देशांमध्ये फेसबुकने डेटिंग सेवा सुरु केली आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने मे महिन्यात फेसबुकच्या वार्षिक परिषदेमध्ये डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखवल्यानंतर फेसबुकने अवघ्या चार महिन्यांमध्ये ही सेवा सुरु केल्याची माहिती झकरबर्गनेच फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

फेसबुक वापरणारे दोन दशलक्षहून अधिक युझर्सचे रिलेशनशिप स्टेटस सिंगल आहे. आता फेसबुकने आपल्या खांद्यावर याच सिंगल युझर्सला जोडीदार मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे. मार्क झुकेरबर्ग हि सेवा सुरु झाल्याची माहिती देताना फेसबुक पोस्टमध्ये म्हणतो, जेव्हा वेगवेगळ्या देशांमधील शहरांमध्ये मी फिरतो तेव्हा मला अनेकजण त्यांचा जोडीदार फेसबुकवरुन भेटल्याचे सांगतात. मला ते ऐकताना खूप आनंद होतो.

फेसबुकवर आम्ही अद्याप डेटिंगचे फिचर दिले नव्हते. पण आता आम्ही अमेरिकेत फेसबुक डेटिंगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा कसे काम करते आणि त्याच्या माध्यमातून समान आवड निवड असणारे लोक कशापद्धतीने जवळ येतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. या सेवेसंदर्भात आम्ही सुरक्षातज्ज्ञांशी सुरुवातीपासूनच सल्ला घेतला आहे. आम्ही युजर्सच्या गोपनीयतेची पुरेपुर काळजी घेतली आहे. ही सेवा लवकरच इतर देशांमध्येही सुरु केली जाईल.

त्यामध्ये भारताचा समावेश लवकरच होणार आहे. युजर्सच्या फेसबुक अकाऊंट आणि डेटिंगचे अकाऊंट हे वेगळे असणार आहे. युजर्सला मुख्य फेसबुक अकाऊंटवरुन आपली मित्र किंवा मैत्रिण हे डेटिंग फिचर वापरत आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही. डेटिंग ऍपद्वारे युजर्सना समोरच्या व्यक्तीशी फक्त चॅटिंग करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)