हृतिक रोशन हा बॉलिवूडमधला सर्वात फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी हृतिकचा “सुपर 30′ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्याने आयआयटीसाठी गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती.
“सूपर 30′ चे चित्रीकरण संपल्यानंतर हृतिककडे “वॉर’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात अवघ्या दोन महिन्यांचा अवधी होता. या दोन महिन्यांत हृतिकला शरिरयष्टीवर मेहनत घ्यायची होती. हातात केवळ दोन महिन्यांचा अवधी असताना हृतिकने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. केवळ दोन महिन्यात त्याने आनंद कुमार ते कबीर हा प्रवास पुर्ण केला.
हा वेळ खूपच अपूरा होता असे हृतिक म्हणाला. “सूपर 30 नंतर शरीर खूप आळसावल होत. मी जिम जाण सोडल होत. शरीर स्थूल झाल होत. वॉरसाठी उत्तम शरिरयष्टी आवश्यक होती. मात्र ती होण्यासाठी काही महिने जिमममध्ये मेहनत घेण तितकच गरजेच होत. चित्रपटासाठी मी 24 तास काम करत होतो. या 24 तासांमध्ये चित्रपटाचे संवाद पाठ करण, कपडे ट्रॉय करण, डॉक्टरांकडे उपचार घेण आणि त्यानंतर वेळात वेळ काढून जिमला जाण या सगळ्याच गोष्टी करत होतो’ असा अनुभव हृतिकन सांगितला.