5 बिलियन डॉलरचा दंड भरण्यास फेसबूक तयार

वॉशिंग्टन – वापरकर्त्याची माहिती चोरी झाल्या प्रकरणी आणि ही माहिती त्या युजर्सला न पुरवणे या प्रकरणी युएस एफटीसी (फेडरल ट्रेड कमिश्‍नर)ने फेसबूकला 5 बिलियन डॉलरचा दंड ठोठावला होता. हा दंड भरण्यास फेसबूक तयार असून लवकरच ते एफटीसीकडे ही रक्‍कम हस्तांतरीत करणार आहेत.

5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा दंड देण्याव्यतिरिक्त, फेसबुक स्वत:वर आता नवीन निर्बंध लादणार असून त्या द्वारे ते वापरकर्त्यांसाठी सुधारित कॉर्पोरेट संरचनेवर आधारीत गोपनीयतेबद्दल नविन धोरणे तयार करणार असून या धोरणांची संपुर्ण माहिती वापरकर्त्याला देण्यात येणार आहे.

यासंदर्भात बोलताना फेसबूक कंपनीचे प्रवक्ते म्हणाले की, आम्ही एफटीसीकडे हा दंड भरण्यास तयार असून आम्ही त्या दंडाबरोबरच आमच्या नविन प्रायव्हसी पॉलिसींमधील बदल आणि वापरकर्त्याची माहिती उघड होवू नये यासाठी करण्यात येणाऱ्या नविन योजना या देखील आता संबंधीत विभागासमोर मांडणार आहोत. फेसबूकवर झालेला हा दंड आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड असून या पुर्वी कोणत्याही कंपनीला वापरकर्त्याची गोपनिय माहिती उघड केल्या प्रकरणी झालेल्या दंडापेक्षा हा 20 पटीाने अधिक मोठा दंड आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)