फेसबुकचा प्रमुख मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवर दिवसाला तब्बल 46 लाख खर्च

वॉशिंग्टन – जगातील सर्वात मोठी सोशल मिडिया कंपनी असणाऱ्या फेसबुकचा प्रमुख मार्क झुकेरबार्ग यांच्या सुरक्षेवर कंपनीने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

दिलेल्या माहितीनुसार मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवर 2020 या एका वर्षात 2.3 कोटी डॉलर्स म्हणजे 170 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. भारतीय चलनाच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांच्या सुरक्षेवर दररोज 46 लाख रुपये खर्च झाला आहे. फेसबुकनेच सिक्‍युरिटी व एक्‍स्चेंज कमिशनला ही माहिती दिली आहे.

यातील 99 कोटी घर आणि खासगी सुरक्षेवर खर्च झाले आहेत तर बाकी 72 कोटी अतिरिक्त सुरक्षेवर खर्च झाले आहेत. कोविडमुळे प्रवास प्रोटोकॉल, अमेरिकेतील निवडणूक काळातील सुरक्षा कव्हरेजमुळे हा जादा खर्च करावा लागल्याचे आणि तो खर्च योग्य आणि गरजेचा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

मार्क वार्षिक पगार म्हणून फक्त 1डॉलर घेतो. बोनस, इक्विटी, पुरस्कार वा अन्य भत्ते तो घेत नाही असाही खुलासा कंपनीने केला आहे. नुकतीच फेसबुकच्या युजर्सचा डेटा लिकची घटना घडली असून फेसबुकच्या इतिहासात हा सर्वात मोठा डेटा लिक प्रकार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.