Meta Platforms – 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत Facebook आणि Instagram ने 14 अब्ज डाॅलर म्हणजेच प्रति शेअर 5.33 डाॅलर कमावले आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामची कॅलिफोर्नियास्थित मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंक सांगितले की, ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत त्यांनी 14 अब्ज डाॅलर म्हणजेच प्रति शेअर 5.33 डाॅलर कमावले. ते एका वर्षापूर्वीच्या 4.65 अब्ज डाॅलर किंवा 1.76 डाॅलर प्रति शेअरपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे कंपनीचा महसूल वार्षिक 25 टक्के वाढून 40.11 अब्ज डाॅलर झाला आहे. एका वर्षापूर्वी तो 32.17 अब्ज डाॅलर होते.
मेटा प्लॅटफॉर्म्स इंक ने एका निवेदनात म्हंटले आहे की, “आमच्या कंपनीसाठी हे एक महत्त्वाचे वर्ष होते. आम्ही आमची ऑपरेशनल शिस्त वाढवली, आमचे उत्पादन प्राधान्यक्रम मजबूत केले आणि आमच्या सेवांवर अवलंबून असलेल्या व्यवसायांसाठी जाहिरात कार्यप्रदर्शन सुधारले. त्यामुळे हे शक्य झाले आहे.”