शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 जूनपर्यंत मुदतवाढ

पुणे – उच्च शिक्षण संचालनालयाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी चालू शैक्षणिक वर्षात अर्ज सादर करण्यासाठी दि.30 जूनपर्यंत महाविद्यालयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीची ही शेवटची संधी असणार आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी मुदतीमध्ये अर्ज भरण्यासाठी महिावद्यालय, संस्था, विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला पाहिजे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज संस्था व विभाग स्तरावर दररोज निकाली काढणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज प्रलंबित ठेवू नयेत. हे अर्ज निकाली काढण्यासाठी आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. प्रलंबित अर्जाबाबत भविष्यात उद्‌भवणाऱ्या बाबींना संबंधित विद्यापीठाचे कुलसचिव व महाविद्यालयातील प्राचार्यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.