नवी दिल्ली – देशातील करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने करोना चाचणी किट्सच्या निर्यातीवर बंदी लागू केली आहे. या संबंधात विदेश व्यापार विभागाने एक अधिसूचना आज जारी केली आहे. आत्तापर्यंत या उपकरणांच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध लागू नव्हते. पण देशांतर्गत गरज लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे. आता कोणतीही वैद्यकीय उपकरणे निर्यात करताना डायरेक्टर जनरल ऑफ फॉरिन ट्रेडची अनुमती घ्यावी लागणार आहे.
करोनाशी संबंधित वैद्यकीय उपकरणे निर्यातीला आधी बंदी होती पण नंतर ती काही काळ उठवण्यात आली होती पण आता पुन्हा ती लागू करण्यात आली आहे असे सांगण्यात येत आहे. देशाच्या विविध भागात चाचणी किट्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.