मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी, राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केलेले, पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केले आहे. माने यांनी या प्रकरणातल्या संशयित आरोपीला फोन आणि सीमकार्ड उपलब्ध करून दिलं होते असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणासंदर्भात मुंबई पोलीस दलातले एकूण पाच जण तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत, त्यापैकी तिघांना तपास यंत्रणेने अटक केली आहे, तर महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाकडून दोन जणांचा ताबा मिळवला आहे.
दरम्यान स्फोटकांनी भरलेल्या कारच्या तपासासंदर्भात आणि उद्योजक मासुख हिरेन यांच्या हत्येसंदर्भात “एनआयए’ने शनिवारी माए यांना मुंब्रा खाडी येथे नेले. हिरेन यांचा मृतदेह याच खाडीमध्ये रेती बंदर येथे 5 मार्च रोजी आढळून आला होता. चौकशीसाठी त्यांना अंधेरी आणि मुंब्रा खाडीसह गुन्हेगारीसंबंधित विविध ठिकाणी नेण्यात आले, असे एका अधिकार्याने सांगितले.