‘एवढे’ कोटी रूपये आहे राम मंदिराचा अपेक्षित ‘खर्च’; बांधकाम पूर्ण होण्यास लागणार 3 वर्ष

मुंबई – अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राममंदिरासाठी अंदाजे 1,100 कोटी रुपये खऱ्च्‌ अपेक्षित आहे आणि हे मंदिर 3 वर्षांमध्ये बांधून पूर्ण होईल, अस विश्‍वास राममंदिर निर्माणासाठी नियुक्‍त केलेल्या राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी व्यक्‍त केला आहे.

“मुख्य मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत बांधले जाईल आणि यासाठी 300 ते 400 कोटी रुपये खर्च येईल. तेथील संपूर्ण 70 एकर जागेच्या विकासावर 1,100 कोटी रुपयांचा खर्च होईल.’ असे स्वामी गोविंद देवगिरी यांनी सांगितले. राममंदिराच्या उभारणीशी संबंधित तज्ञांशी चर्चा केल्यानंतर खर्चाचा अंदाज व्यक्‍त केला गेल्याचे त्यांनी सांगितले.

राममंदिराच्या खर्चाच्या अंदाजाबाबत न्यासाकडून आतापर्यंत अधिकृतपणे निवेदन जाहीर केले गेलेले नाही. या राममंदिराच्या उभारणीसाठी आवश्‍यक निधीसाठी काही उद्योगपतींकडून आर्थिक सहकार्य शक्‍य झाले. काही उद्योजकांच्या कुटुंबांनीही न्यासाशी संपर्क साधला आणि राममंदिराच्या उभारणीचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती. मात्र ही विनंती सविनय नाकारण्यात आल्याचेही स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी सांगितले.

भाजपच्या निवडणूक निधीशी काहीही संबंध नाही…
भाजपच्या 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्य प्रचारासाठी राममंदिर निर्माणासाठी केले जात असलेले निधी संकलन केले जात असल्याचा आरोप स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी फेटाळून लावला. लोक ज्या रंगाचा चष्मा लावतात, त्याच रंगाचे त्यांना सर्वकाही दिसते.

आम्ही मात्र कोणताही चष्म वापरत नाही. आमचे लक्ष केवळ सत्कर्माकडे असते. निधी संकलनासठी 5 लाख गावांपर्यंत आणि 15 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी संगितले. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राममंदिरासाठी योगदान द्यायला तयार असतील, तर त्यांच्या घरी जायला आपण तयार असल्याचेही गोविंद देवगिरी महाराजांनी संगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.