बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकनच्या मागणीत घट

मटणाला पसंती; भावात 20 रुपयांनी वाढ : इंग्लिश आणि गावरान आंडीचे भाव स्थिर

पुणे – मागणी, आवक यातील समतोलामुळे मासळीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तर, मटणाला मागणी वाढल्याने भावात 20 रुपयांनी वाढ झाली. तर, बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकनची मागणी 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. यामुळे भावात किलोमागे 10 रुपयांनी घट झाली. इंग्लिश आणि गावरान आंडीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.

गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि.24) खोल समुद्रातील मासळीची सुमारे 12 टन, खाडीची सुमारे 200 ते 400 किलो, तर नदीच्या मासळीची 1 ते 1.5 टन आवक झाली. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 12 ते 15 टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो भाव)

पापलेट : कापरी : 1400-1500 मोठे 1400, मध्यम : 1000, लहान 7800, भिला : 550, हलवा : 550, सुरमई : 550, रावस : लहान 600, मोठा : कट 750, घोळ : 600, भिंग : 400, करली : 280-320, करंदी : सोललेली 480, पाला : लहान 800, मोठे : 1200-1400, वाम : लहान 650, मोठी 900, ओले बोंबील : 200, कोळंबी ः लहान 280-320, मध्यम 480, मोठे 600, जंबोप्रॉन्स : 1200-1400 किंगप्रॉन्स : 750-800, लॉबस्टर : 1200, मोरी : 320-360, मांदेली : 120-140, राणीमासा : 200, खेकडे : लाल 200, चिंबोऱ्या : 600. खाडीची मासळी : सौंदाळे : 280, खापी : 280, नगली : लहान 400, मोठी 700, तांबोशी : 480, पालू : 360, लेपा : लहान 120 मोठे 240, शेवटे : 200 बांगडा : लहान 200 , मोठे 240, पेडवी : 100, बेळुंजी : 160 तिसऱ्या : 240, खुबे : 140, तारली : 180-200, नदीची मासळी : रहू :140-160 कतला :160, मरळ : 440, शिवडा : 240, खवली : 240, आम्ळी :160, खेकडे : 200,वाम : 550. चिकन : चिकन : 160, लेगपीस : 200 जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 260. अंडी : गावरान : शेकडा : 730 डझन : 100 प्रति नग : 8.50, इंग्लिश : शेकडा : 430 डझन : 60 प्रतिनग : 5.  मटण : बोकडाचे : 660 बोल्हाईचे : 660 खिमा : 660, कलेजी : 660.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.