मुंबई- संजू बाबाच्या चर्चेत असलेल्या ‘प्रस्थानम’ चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट नऊ वर्षांपूर्वी आलेल्या ‘प्रस्थानम’ नावाच्याच तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. दरम्यान, आता या चित्रटातील संजय दत्ताचा फर्स्ट लुक देखील प्रेक्षकांच्या समोर आला आहे. हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Earn the legacy… virasat se nahi, kabiliyat se! #Prasthanam in cinemas on 20th September 2019.@mkoirala @bindasbhidu @ChunkyThePanday @alifazal9 @AmyraDastur93 @satyajeet_dubey @thechahatt #DivinaaThackur @devakatta @maanayata_dutt @Sandy_Bhargava pic.twitter.com/9pSo7ynSKB
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 8, 2019
‘प्रस्थानम’ मध्ये संजय दत्त बरोबर अभिनेत्री मनीषा कोईराला, अमायरा दस्तूर आणि अभिनेते जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, आणि अली फजल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट सिनेरसिकांसाठी एक चांगली मेजवानी असणार हे नक्कीच.