काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची आज रात्री 9 वाजता होणार घोषणा

नवी दिल्ली – लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून काँग्रेसचं अध्यक्षपद रिक्त आहे.

अध्यक्षपदाच्या नेमणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत अनेकदा बैठका घेतल्या. पण कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक गहलोत, सचिन पायलट अशी अनेक नावं समोर आली आहेत, तर मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे यांची नावेसुध्दा आघाडीवर आहेत.

शनिवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर रात्री 8.30 वाजता पुन्हा काँग्रेस नेते भेटणार आहेत आणि त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची घोषणा होईल, अशी माहिती काँग्रेसच्या अधिर रंजन चौधरी यांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.