सोलापूर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा संपूर्ण महाराष्ट्राला आता परिचीत झाल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा शर्मा यांनी केली आहे. या पार्श्वभुमीवर करूणा मुंडे यांनी आज पंढरपुर येथे विठ्ठल दर्शन घेतले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंबाबत पुन्हा धक्कादायक खुलासा केला आहे
दरम्यान, करुणा शर्मा यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्या माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा करुणा शर्मा यांनी आरोप केले आहे त्या म्हणाल्या,’“धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली, अनेक बायकाही लपवल्या मग अजूनही मंत्रिमंडळात कसे?”
त्या पुढे म्हणाल्या, ‘राजकारण कसं चालतं हे मी गेली 25 वर्षापासून पाहत आली आहे. मात्र आता कोल्हापुरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहोत. मला जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जायचे आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे आहे. ‘मी महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे.’ असं म्हणत येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरात जाहीर केले आहे.