नवी दिल्ली – नवीन ईपीएफओ नियमानुसार, वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत ईपीएफओ खातेदारांना आता एक लाखांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करता येणार आहे. कोणत्याही कागदपत्रांच्या प्रक्रियेशिवाय खातेधारक एक लाख रुपयांची रक्कम काढू शकतील. खातेधारकांना या नवीन नियमाचा मोठा लाभ होणार आहे.
जाणून घ्या, सुधारित नियमानुसार PF खात्यातून पैसे काढण्याच्या अटी-
ईपीएफओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सरकारी/ CGHS पॅनेल रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असावे.
खासगी रुग्णालयांच्या स्थितीत, प्राथमिक चौकशी करुन पैसे काढण्यास मान्यता देण्यात येईल, जर कामकाजाच्या दिवशी अर्ज दाखल केल्यास, पैसे तत्काळ दुसऱ्या दिवशी वर्ग करण्यात येतील. तसेच पैसे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यात किंवा रुग्णालयाच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील.
अशी आहे पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया –
सर्वात आधी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईट www.epfindia.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
– त्यानंतर ‘ऑनलाईन सर्व्हिस’वर क्लिक करा.
– तुम्हाला फॉर्म 31, 19, 10C आणि 10D भरावा लागेल.
– नंतर अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक एन्टर करा
– ‘ऑनलाईन क्लेम साठी प्रक्रिया’ वर क्लिक करा.
– ड्रॉप-डाउन मेन्यूमधून फॉर्म 31 निवडा, नंतर पैसे काढण्याचे कारण प्रविष्ट करा.
– रक्कम एन्टर करा आणि तुमच्या हॉस्पिटल बिलाची कॉपी अपलोड करून तुमचा अॅड्रेस प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा
दरम्यान, या नवीन नियमापूर्वी पीएफचे पैसे मिळण्यासाठी 3 दिवस लागत असे. मात्र नवीन नियमामुळे अवघ्या एका तासात पैसे मिळण्यास मदत होणार आहे.
ईपीएफने कोरोनाच्या वेळी उपचारांच्या सोयीसाठी ही विशेष व्यवस्था सुरू केली होती. मात्र आता इतर आजारांच्या उपचारांसाठीही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणासाठी आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल, तर तो त्याच्या खात्यात एक लाख रुपये सहज ट्रान्सफर करू शकतो. पूर्वीच्या उपचारांप्रमाणेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पैशांची गरज भासल्यास त्यासाठी वैद्यकीय बिले सादर करावी लागत होती. आता त्याची गरज नाही.