मराठीतही मनोरंजनाची मेजवानी, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिबट्या’

पोस्टरचे अनावरण झाले. या पोस्टरवरून प्रकाशाने झगमगलेले शहर दिसत आहे व लांब कुठल्यातरी डोंगरावरून एका काळ्या आकृतीतील बिबट्या त्या शहराकडे बघताना दिसत आहे.

विजय पाटकर, महेश कोकाटे, अनंत जोग, प्रमोद पवार, सोमनाथ तडवळकर, सुभोद पवार, चैत्राली डोंगरे, सुशांत मांडले, डॉ. विलास उजवणे, अशोक कुलकर्णी, ज्ञानदा कदम, मनश्री पाठक, सचिन गवळी, आदी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. हे पोस्टर पाहून लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या चित्रपटाची निर्मिती स्वयंभू प्रॉडक्‍शनची असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा चंद्रशेखर सांडवे यांची आहे, तर पटकथा चंद्रशेखर सांडवे व आर. मौजे यांची असून या चित्रपटाचे संवाद कमलेश खंडाळे यांनी लिहिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.