खादी मास्कची निर्यात होणार

नवी दिल्ली- खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने तयार केलेले खादी मास्क देशात बरेच लोकप्रिय झाले आहेत. लवकरच त्यांची निर्णय होणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

महामंडळाने आतापर्यंत सहा लाख मास्कचा पुरवठा केला आहे. त्यामध्ये राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, केंद्र सरकारची मंत्रालये, जम्मू-काश्‍मीर प्रशासनाचा समावेश आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना ई-मेलच्या माध्यमातून ऑर्डर मिळाल्यास या मास्कचा पुरवठा केला जातो.

केंद्र सरकारने मास्कवरील निर्यातबंदी उठविली आहे. यामुळे आता अमेरिका, दुबई, मॉरिशस आणि इतर युरोपियन देशांना खादी मास्कची निर्यात करण्यात येणार आहे. कारण या देशात खादी महामंडळाची उत्पादने अगोदच लोकप्रीय झाली आहेत असे महामंडळाचे अध्यक्ष विनयकुमार यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि महामंडळ खादी उत्पादने लोकप्रीय करण्याच प्रयत्न करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.