मंचर-आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात 40 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांनी दिली.
सौरऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यावतीने महाविद्यालयात प्रशासकीय इमारत व मुलींचे वसतिगृह यांच्याकरिता प्रत्येकी 20 किलोवॅट सौरऊर्जेचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. प्रकल्पाचे काम संस्थेमध्ये, विद्युत नूतनीकरण समन्वयक डॉ. ए. एस. माने, डॉ. आर. एम. वरखेडकर व एन. डी. पडवळे यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पाकरिता प्रा. एस. व्ही. जोशी, प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.
याप्रसंगी मुलींच्या वसतिगृहाच्या कुलमंत्री डॉ. किर्ती ठाकूर, ए. व्ही. कुलकर्णी उपस्थित होत्या. या प्रकल्पामुळे संस्थेला येणारे वीज देयक कमी होणार असून नैसर्गिक स्रोताद्वारे विद्युत निर्मिती करण्यास चालना भेटणार आहे.