हिंगोली – (शिवशंकर निरगुडे) : शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वेलतुरा येथे घडली आहे. महेश मदन सानप असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे हिंगोली जिल्ह्यात गेल्या 20 दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली होती मात्र मंगळवारी मुसळधार पाऊस पडला. महेश सानप आई-वडिलांसह शेतात काम करत होता. त्यावेळी अंगावर वीज पडून महेश सानप याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, उपचारासाठी त्याला तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. या घटनेने सेनगाव तालुक्यातील व वेलतूरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.