एकनाथ खडसे यांचा फोन टॅप केल्याची चर्चा

मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप असताना, भाजप नेते एकनाथ खडसे यांचा फोन टॅप केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. फडणवीस सरकाने तीन मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सदस्यीय समिती नेमली आहे. गृहविभागाने गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि गुप्तचर विभागाचे पोलिस सहआयुक्त अमितेश कुमार हे या समितीचे सदस्य आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून, गृह विभागाला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या तीन नेत्यांचे फडणवीस सरकाने फोन टॅप केल्याचा आरोप आहे. मात्र आता भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ खडसे फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या आरोपामुळे त्यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.