जम्मू – जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर किंवा प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक भारतीय हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तेथे आत्तापर्यंत आठ हजार बंकर्स बांधण्यात आले आहेत.
भारत पाक यांच्यातील जवानांमध्ये चकमक सुरू झाली किंवा पाकिस्तानी हद्दीतून भारतीय हद्दीत तोफगोळ्यांचा मारा सुरू झाला की, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. केंद्र सरकारने व्यक्तिगत तसेच सामूहिक पाळीवर तेथे 14 हजार 460 बंकर्स बांधण्यास अनुमती दिली आहे.
त्यापैकी आठ हजार बंकर्स उभारणीचे काम आत्तापर्यंत पुर्ण झाले आहे. जे सुमारे आठ हजार बंकर्स बांधण्यात आले आहेत ततील 6964 बंकर्स छोट्या स्वरूपातले म्हणजे व्यक्तिगत स्वरूपातले असून 959 बंकर्स सामुहिक स्वरूपातील आहेत.
सध्या दोन्ही देशांतील सीमेवरील चकमकी पूर्ण थांबल्या असून गेल्या तीन महिन्यात तेथे एकही चकमक झालेली नाही. किंवा पाकिस्तानी हद्दीतून शस्त्रसंधीचा भंग करण्याचे प्रमाणही बऱ्याच अंशी घटले आहे. जम्मू विभागाच्या उपायुक्तांनी आज बंकर्स व्यवस्थेसंबंधी माहिती देताना कोणत्या भागात किती बंकर्स बांधण्यात आले आहे याची तपशिलाने आकडेवारी सादर केली.