नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाच्या 1 लाख 14 हजार 460 नवीन केसेस आढळल्या आहेत. हा गेल्या 60 दिवसांतला सर्वात नीचांकी आकडा आहे. दरदिवसाचा पॉझिटिव्हीटी रेटही आता खूप खाली आला असून तो आज 5.62 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
गेले सलग तेरा दिवस तो नियंत्रणात राहिला आहे. गेल्या 24 तासांत करोनामुळे एकूण 2677 लोक मरण पावले. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 3 लाख 46 हजार 759 इतकी झाली आहे.
देशातील सक्रिय बाधितांची संख्या आता 14 लाख 77 हजार 799 इतकी आहे. देशातील लसीकरणाचे प्रमाणही सध्या काहीं प्रमाणात वाढताना दिसत असून आत्तापर्यंत 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 जणांना करोना लसींचे डोस देण्यात आले आहेत.