नेतेपदावरून जनता पक्षात भांडणे नाहीत
हैदराबाद, दि. 19 – जनता पक्षास निवडणुकांत बहुमत मिळाले तर नेता कोण असावा यावरून भांडणे होतील असे मला वाटत नाही, असे उद्गार पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई यांनी काढले. जनता पक्षात फॅसिस्ट लोकांचे प्राबल्य आहे.
मधोकही आमच्यात सामील झाले. मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क असू नये ही पक्षाची भूमिका असून हा कायदेशीर हक्क असावा. निवडणुकीबाबत आपण आशावादी असल्याचे मोरारजी म्हणाले.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी दक्षता समित्या नेमाव्यात
नवी दिल्ली – भ्रष्टाचार व सामान्य माणसावरील दडपशाही कमी होण्यासाठी दक्षता समित्या नेमण्याची सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.
राज्यांच्या भ्रष्टाचारविरोधी खात्यांच्या प्रमुखांची एक परिषद नुकतीच घेण्यात आली. तीत भ्रष्टाचार व लोकांवर होणारी दडपशाही थांबविण्यासाठी काही शिफारसी करण्यात आल्या. त्याची वेगाने अंमलबजावणी व्हावी, याची या समित्या खातरजमा करतील.