कसेल त्याची जमीन
गंगटोक, दि. 2 – सिक्कीमने आज पहिला हुकूम काढून त्याद्वारे जमीन कसणाऱ्यास त्याच्या जमिनीवरून हाकलण्यास बंदी केली. सिक्कीमच्या सरकारने भूमिहीन शेतमजुरांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला हा पहिला महत्त्वाचा निर्णय आहे.
चीनची भारतात ढवळाढवळ
मॉस्को – भारतातील विरोधकांना चीनने दिलेला पाठिंबा ही भारताच्या अंतर्गत प्रश्नात केलेली ढवळाढवळ आहे, असे प्रावदा या रशियन वृत्तपत्राने म्हटले आहे. योजिलेल्या उपायांनंतर करण्यात आलेल्या आणीबाणीमुळे चांगले परिणाम घडत आहेत, अशीही शिफारस प्रावदाने केली आहे.
आंध्रात सोन्याचा शोध
नवी दिल्ली – आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात रामगिरी येथील सोन्याच्या क्षेत्रात सोने मिळविण्याकरिता संशोधन करण्याचा कार्यक्रम भारत गोल्ड माइन्स लिमिटेड या कंपनीने सुरू केला आहे.
1974 पासून राज्यात देवीची लागण नाही
मुंबई – ऑगस्ट 1974 पासून महाराष्ट्रात कोणासही देवीची लागण झाली नसल्याचे आरोग्यमंत्री डिसूझा यांनी सांगितले. ऑगस्ट 1974 पर्यंत महाराष्ट्रात 450 जण देवीची लागण झालेल्यांपैकी होते व त्यापैकी 45 जण मरण पावले. परंतु त्यानंतर कोणासही देवीची लागण झाली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे.