तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील ॲड् पु.वा. परांजपे विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या वेळी प्रदर्शन, गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
नू.म.वि.प्र. मंडळाचे सचिव संतोष खांडगे, सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेश शहा, विनायक अभ्यंकर, यादवेंद्र खळदे,चंद्रकांत शेटे, अशोकराव काळोखे, माजी विद्यार्थी विकास भेगडे , मुख्याध्यापक कैलास पारधी संजय वंजारे, भाऊसाहेब आगळमे, वासंती काळोखे, सविता चव्हाण, अनिता लादे, माजी विद्यार्थी, बाळासाहेब शिंदे, बबनराव तांबे, पांडुरंग कापरे, भगवान शिंदे, श्रीकृष्ण मुळे उपस्थित होते.
या वेळी ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. हस्तकला व चित्रकला दालनचे उद्घाटन, रांगोळी, विज्ञान व गणित प्रदर्शन, वार्षिक अहवालाचे वाचन, हुतात्मा क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे विद्यार्थीरत्न गौरव पुरस्कार देण्यात आले. कुस्तीपटू ईश्वरी झिंझुरके, आठवी ते दहावी गटांमध्ये गुणवंत विद्यार्थी शुभम माळी यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक काळोखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती बारमुख व सुवर्णा काळडोके यांनी केले. आभार कमल ढमढेरे यांनी मानले