रांची – अवैध खाण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. झारखंड, राजस्थान, हरिणायासह पाच राज्यांमध्ये 18 ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईत 17 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ईडीचे पथक आज सकाळी झारखंड, राजस्थान, हरियाणा, बिहार आणि पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले असून छापेमारी केली. झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथील आयएसएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली.
याशिवाय व्यावसायिक अमित अग्रवाल यांच्याही अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. ईडीचे हे पथक दिल्लीहून आल्याची माहिती आहे. ईडीने पंचवटी रेसिडेन्सी, ब्लॉक नंबर 9, चांदणी चौक, हरिओम टॉवर, नवीन बिल्डिंग, लालपूर, पल्स हॉस्पिटल, बरियाटू, आयएस पूजा सिंघल यांच्या सरकारी निवास स्थानावर छापे टाकले.
झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी राम शंकर यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान आज सुरु असलेले छापेमारी आएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित आहे. दरम्यान ईडीने आज झारखंडमधील खाण आणि भूविज्ञान विभागाच्या सचिव पूजा सिंघल आणि व्यावसायिक अमित अग्रवाल यांच्या रांची येथील जागेवर हा छापा टाकण्यात आला आहे.