सातारा – माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उद्या, दि. 19 रोजी वाढदिवस आहे. एका महत्त्वाच्या बैठकीसाठी खा. रणजितसिंह उद्या नवी दिल्लीत असल्याने आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते फलटणमध्ये उपस्थित राहणार नाहीत. सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेतच; परंतु सध्या जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे जनतेने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शासनाने कोविडसंदर्भात केलेले नियम आणि प्रशासनाने लागू केलेल्या आदेशांचे, सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.