तेहरान – इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. या विमानात १८० प्रवासी आणि क्रू मेंबर होते. तर याआधी इराणच्या बुशहर शहरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहे. यामध्ये कुठल्याही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
बुशहर शहरात अणुऊर्जा केंद्राजवळ आज भारतीय वेळेनुसार ७.५० वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. याची ४.९ इतकी रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. याच ठिकाणी मागील डिसेंबर महिन्यातही भूकंपाचे धक्के बसले होते.
A 4.9 magnitude earthquake struck near #Iran‘s Bushehr: United States Geological Survey
— ANI (@ANI) January 8, 2020
दरम्यान, इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर काही क्षेपणास्त्रे डागली. ही कारवाई सुरु असल्याने यातूनच आवाज किंवा हादरे जाणवत असावेत असा समज होता. मात्र, हे हादरे हवाई हल्ल्यांमुळे नव्हे तर नैसर्गिकरित्या आलेल्या भूंकपाचे धक्के असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने स्पष्ट केले आहे.
#Borazjan #Earthquake happened in the province of #Bushehr where #Iran has its #nuclear power plant #WW3 pic.twitter.com/AoOCZmlFNJ
— MrFree (@MrFree_W) January 8, 2020