मॉस्को – कर्करोगाचे निदान वेळेवर न होत असल्यानेच हा रोग भयंकर मानला जातो आता रक्तातील पेशींच्या माध्यमातूनही कर्करोगाचे निदान करणे शक्य आहे पण हे निदानही वेळखाऊ असते पण आता रशियातील वैद्यकीय तज्ञांनी अशा एका तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे.
ज्यामुळे रक्तातील कर्क रोग पेशींचा शोध खूपच लवकर लागणार आहे सेवेरोत स्टेट युनिव्हर्सिटी तंत्रज्ञांनी हा शोध लावला असून त्याबाबतचा लेख सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रक्ताचे विस्तृत पृथक्करण करून प्राथमिक पातळीवरच रक्तातील कर्करोगाची पेशी शोधली जाऊ शकतात जर रक्तामध्ये कर्करोगाचा प्रवेश झाला असेल तर प्राथमिक पातळीवरच शस्त्रक्रिया करून किंवा इतर उपचार करून त्यावर मात करणे आता शक्य होणार आहे.
या तंत्रज्ञानामध्ये अल्ट्रासाउंड मशीनचा वापर करून रक्ताचे पृथक्करण केले जाणार आहे आणि विविध पेशींचा अभ्यास करून कर्करोगग्रस्त पेशी कोणत्या आहेत याचा शोध घेतला जाणार आहे शरीरातील रक्तप्रवाहाच्या वेगाची नोंद अल्ट्रासाउंड मशीनवर घेतली जाते.
त्यातून निष्कर्ष काढून संबंधित व्यक्तीच्या रक्तामध्ये कर्करोगाच्या पेशी आहेत का नाहीत याबाबत निदान केले जाते हे संशोधन आणि तंत्रज्ञान जरी सध्या प्राथमिक पातळीवर असले तर नजीकच्या कालावधीमध्ये हे तंत्रज्ञान अजून सुसज्ज करून लवकरच उपयोगात आणले जाईल अशी माहिती मिळत आहे.