पुणे -राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाकडून अहमदनगर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आता स्वारगेट येथून कोल्हापूरसाठी चार तर कोल्हापूर येथून पुण्यासाठी चार अशा ई-शिवाई बस शुक्रवारपासून सोडण्यात आल्या.
एसटीच्या पुणे विभागात देखील बस तयार होतील तशा टप्प्याटप्प्याने बस ताफ्यात दाखल होतील. राज्यातील पहिली ई-बस पुणे-नगर मार्गावर सुरू केली त्यानंतर पुण्यातून मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या मार्गावर ई-शिवाई आणि ई-शिवनेरी सेवा सुरू झाली आहेत. पुणे विभागाकडे चार बस दाखल झाल्या आहेत. तर, कोल्हापूर आगाराला चार बस मिळाल्या आहेत. दरम्यान, सकाळी पाच वाजेपासून या सर्व बस स्वारगेट आणि कोल्हापूर येथून सुटत आहेत. दिवसभरात या बसच्या जाऊन-येऊन 20 फेऱ्या होणार आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटीचे पुणे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी केले.
असे आहे वेळापत्रक
सकाळी 5.00, 5.30, 6.30, 9.00, 9.30, 10.30.
दुपारी 1.30, 2.30, 3.30
सायंकाळी 7.30