नवी दिल्ली – लॉकडाऊन उघडल्यानंतर आता ई-कॉमर्सवरील पुरवठादार वेगाने कामकाज सुरू करू लागले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
त्यासंदर्भात फ्लिपकार्ट या कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, आमचे 90 टक्के पुरवठादार पुन्हा काम सुरू करू लागले आहेत. ग्राहकाकडूनही विचारणा वाढली आहे. त्यामुळे एक-दोन आठवड्यांमध्ये लॉकडाऊनच्या अगोदरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑर्डरची संख्या वाढत असली तरी त्यातील खरेदीचे प्रमाण आणखी पूर्वीइतके नाही. मात्र, परिस्थिती लवकरच सुरळीत होईल.