नवी दिल्ली – देशभरात गेल्या १८ महिन्यांपासून वैद्यकीय कर्मचारी COVID-19 या आजाराशी लढा देत आहे. करोनाचा प्रकोपात जिथे करोनाग्रस्ताचे नातेवाइक देखील रुग्णाच्या जवळ जाण्यास घाबरत होते.
Salute to our #CovidWarriors.
A team of #Covid warriors crossing river to render their services in rural Ladakh.
Stay Home, Stay Safe, Stay Healthy and Cooperate the Covid Warriors. pic.twitter.com/cAgYjGGkxQ
— Jamyang Tsering Namgyal (@jtnladakh) June 7, 2021
तेव्हा स्वत:च्या जीवावर उदार होऊन ज्यांनी हजारो रुग्णांचे जीव वाचविले अशा वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर, नर्स यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच करोना योद्धांचा असाच एक फोटो पुन्हा सोशलवर व्हायरल झाला असून त्यांचा कामाचे नेटकऱ्यानी कौतुक केले आहे.
व्हायरल फोटोत जेसीबीच्या मदतीने करोना वॉरियर्सने नदी पार केल्याचे दिसून येत आहे. या फोटोला लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी ट्विट करत शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोत पीपीई किट घालून आरोग्य कर्मचारीजेसीबीच्या मदतीने नदी पार करतांना दिसत आहे. त्यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे की,’आपले #CovidWarriors सलाम. ग्रामीण लडाखच्या भागात आपली सेवा देण्यासाठी नदी पार करणारी Covid वॉरियर्सला सर्वानी सहकार्य करावे…घर में रहें, सुरक्षित रहें, स्वस्थ रहें’
दरम्यान, सोशलवर काही तासातच हे फोटो तुफान व्हायरल झाले असून हजारांच्या घरात नेटकऱ्यांद्वारे या फोटोवर लाईक आणि कॉमेंट्स चा वर्षाव झाला आहे.