नगर -शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावली. या पावसाने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे दुसऱ्याच पावसाने मनपाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. सवत्रच रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले होते. या पावसाने सीना नदी ही दुथडी भरून वाहिली.
नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने रविवार रात्री नऊ च्या दरम्यान जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी दुपारीही शहरासह परिसरात दोन तास पाऊस झाला. अगोदरच खड्डेमय असणाऱ्या शहरातील रस्त्यांची आणखी दुरवस्था पावसाने समोर आणली. मात्र, या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असून, खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. याशिवाय यापूर्वी पेरण्या केलेल्या पिकांना तसेच फळबागांनाही या पावसाचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सोमवारी दुपारीही काही भागात संततधार, तर काही भागात जोरदार पाऊस पडला. अनेक तालुक्यांत पावसाने आठ दिवसांपूर्वी पाट फिरलवली होती. त्यामुळे त्यांच्या चिंतेते वाढ झाली होती. मात्र, रविवारी रात्री व सोमवारी दुपारी झाल्येल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा पाऊस धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणेसह नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह होणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.