मुंबई : विधानसभेच्या 288 जागांवर 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दोन मतदानाच्या दोन दिवस आधीपासूनच ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यपी कार्यकर्त्यांची अडचण होणार आहे.
Mumbai City Collector, Shivajirao Jondhale has issued orders to stop sale of all kind of liquor and closure of all liquor shops from 19th to 21st October and 24th October 2019. #MaharashtraAssemblyElections
— ANI (@ANI) October 6, 2019
मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 19 ऑक्टोबरपासून ते 21 ऑक्टोबरपर्यंत तसेच 24 ऑक्टोबरला दिवसभर ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे.19 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 21 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण दिवस ड्राय डे असणार आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशीही पूर्ण दिवस ड्राय डे असणार आहे. या दिवशी दारूची दुकाने तसेच बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे.