पवारांच्या भेटीपूर्वी सोनिया गांधीना पत्र; राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगानेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पण या भेटीपूर्वी सोनिया गांधीना एक पत्र आले असून, या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट सोमवारी निययोजित होती. त्यामुळे या भेटीच्या काही काळ आधी सोनिया गांधीना ‘जमिएत – ए – हिंद’ या संघटनेकडून पत्र आले आहे. या पत्रात ”धर्मांध शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा देऊ नये,” असे म्हटले आहे. यामुळे सोनिया गांधी यांच्यावरील दबाव वाढला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने शिवसेनेला पाठींबा दिल्यास काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, यासाठी काँग्रेसच्या दक्षिण भारतीय नेत्यांनी सोनिया गांधींना सल्ला दिला होता. केरळच्या मुस्लिम खासदारांची संख्या सर्वाधिक असल्याने केरळच्या खासदारांचा मोठा दबाव होता. केरळ राज्यातून काँग्रेसचे १८ खासदार निवडून आले आहेत. ही सर्वाधिक संख्या आहे.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात मंगळवारी देखील भेट होणार होती, परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलून बुधवारी ठरविण्यात आली आहे. बुधवारी होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्राच्या सत्ते बाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.