मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी दि. 18 रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता डॉ. रामास्वामी एन., आयुक्त (कु.क.) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
#राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला होणाऱ्या निवडणुकीकरिता आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. रामास्वामी एन. यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. #PresidentElection2022#ECI pic.twitter.com/AN4vtseDsX
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 12, 2022
राज्यातील कोविड महामारीच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेवून राष्ट्रपती निवडणूक आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाने शासनास नोडल अधिकारी नेमण्याची विनंती केली होती, त्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे.