पुणे : डॉ. श्रीराम लागू यांच्यावर उद्या (शुक्रवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याचे प्रशासनाला आदेश मिळाले असून त्याची तयारी झाली आहे.
मंगळवारी रात्री दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले होते. उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
त्यांच्यावर धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात येतील. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कारकरण्यात येतील.