प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कांचन यांची माहिती
सोरतापवाडी – उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कांचन यांनी दिली.
कांचन म्हणाले की, डॉ. मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने व जिल्हा परिषद पुणे, कृषी व पशू संवर्धन विभाग, पंचायत समिती हवेली, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पुणे, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे व ग्रामपंचायतीच्या सह आयोजनातून गेल्या 2 वर्षांपासून यशस्वीपणे कृषी व पशूपक्षी प्रदर्शन, तसेच खाद्य महोत्सव व शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्री, दुष्काळी भागात चारा वाटप, रक्तदान शिबिर, डॉ. पूज्य मणिभाई देसाई जयंती आदी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.
दर महिन्याला प्रतिष्ठानमधील सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. यावेळी सुनील गोते, रोहिदास कोतवाल, संजय कांचन, सागर कांचन, सुभाष कड, सोमनाथ कोतवाल, नवनाथ मोहिते, संतोष दौंडकर, गोविंद तापकीर आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी आनंदा काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
डॉ. मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानमधील सर्व सदस्य शेतकरी कुटुंबातील आहेत. सर्व सदस्य दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यामुळे आम्ही समाजासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहोत.
-सागर कांचन, कार्याध्यक्ष, माजी उपसरपंच, प्रतिष्ठान, ग्रामपंचायत, उरुळी कांचन.