बीड – माझी मुलगी पूजा चव्हाणबद्दल मीडियामध्ये सुरू असलेली चर्चा बंद करावी. ती गेली, ती आता काय येणार नाही. त्यामुळे तिला बदनाम करू नये, असे आवाहन लहू चंदू चव्हाण यांनी केले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या वडिलांनी प्रथमच समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.
लहू चव्हाण म्हणाले, पूजा चव्हाण ही खूप चांगली मुलगी होती. लोक तिला विनाकारण बदनाम करत आहेत. तिच्या डोक्यावर 25-30 लाख रुपये कर्ज होते. या काळात माझं मन लागत नाही, मला खूप ताण येत आहे, असं म्हणून आठ दिवसांपूर्वी पूजा पुण्याला गेली होती, असे ते म्हणाले.
त्यानंतर हे सगळं सुरू आहे. आमची बदनामी करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. कृपया करून माझ्या मुलीला बदनाम करू नका, या बातम्या थांबवाव्यात, असे पूजाचे वडील लहू चव्हाण म्हणाले.