तामिळनाडुच्या राज्यपालांनाही करोना

चेन्नाई: तामिळनाडुचे राज्यपाल बन्वारीलाल पुरोहित यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना आज चेन्नईच्या कावेरी हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

राजभवनातील काही कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यपालांना काही दिवसांपुर्वी निवासस्थानीच आयसोलेशन मध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. पण अलिकडेच त्यांची पुन्हा नव्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात ते करोना पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात आले.

तथापि त्यांना सध्या करोनाची सौम्य बाधा झाली असून ते वैद्यकीयदृष्ट्या पुर्ण तंदुरस्त आहेत असे रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले. तामिळनाडुच्या राजभवनातील 87 कर्मचारी आत्तापर्यंत करोना पॉझिटीव्ह सापडले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.