डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-२)

एकीकडे कोथिंबिर विकत घेताना दहा ठिकाणी चौकशी करतो, अशा स्थितीत घर खरेदी केवळ विकासकाच्या दाव्याने करणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेला, ऑफरला हुरळून जावून एखादी मालमत्ता खरेदी केली आणि त्याचे बजेट जर आवाक्‍याबाहेर असेल तर अशावेळी आपली स्थिती शोचनिय होते.

डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-१)

लक्ष द्या
इंडिस्ट्रियल कॉरिडॉर किंवा पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा प्रस्ताव समोर आल्यानंतरच संबंधित क्षेत्र हे रिअल इस्टेटच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. त्यामुळे विकसक काहीही सांगत असला तरी जोपर्यंत कागदावर काही दिसत नाही, तोपर्यंत त्यावर विश्‍वास ठेवणे गैर.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसक हे वेगवेगळ्या ऑफरचा आणि सवलतीचा मारा करतात. नव्याने साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाजवळ प्रस्तावित योजनांची माहिती देतात, वास्तविक बिल्डरने सांगितलेल्या विकास योजना प्रत्यक्षात येणार आहेत की नाही याबाबत साशंकता असते. रिंगरोड, विमानतळ, एक्‍स्प्रेस वे, मेट्रो आदी. विकासक छातीठोकपणे अशा योजनांची यादी सादर करून ग्राहकांना घर खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करत असतात.

अर्थात अशा ठिकाणी निर्माणाधिन योजनांत बुकिंग करणे कितपत योग्य आहे, हे तत्कालिन परिस्थितीवर आणि तथ्यावर अवलंबून असते.

कुंडली भागातील निवासी प्रकल्पात गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक झाली आणि मोठा धडा मिळाला. म्हणूनच रिअल इस्टेटमध्ये कोणताही विचार न करता गुंतवणूक करणे ही खूप मोठी चूक सिद्ध होऊ शकते.
कुंडली हे एकमेव उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणे उघडकीस आली आहेत. आपल्या सभोवताली देखील रेंगाळलेले गृहप्रकल्प पाहू शकता. त्यामुळे स्थावर मालमत्तेतून अन्य पर्यायी गुंतवणुकीच्या तुलनेत फारसा फायदा झालेला दिसून येत नाही.

आकडेवारीचे आकलन केल्यास गेल्या काही वर्षात रिअल इस्टेटने दिल्ली, मुंबईत जवळपास 10 ते 12.15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. याच काळात सोने आणि इक्विटीने 11.75 आणि 13 वार्षिक परतावा दिला आहे.

जेव्हा घर खरेदीचा विषय निघतो, तेव्हा बहुतांश मंडळी बचतीचा पैसा बाहेर काढतात. जर पैसे कमी पडत असतील तर अशा स्थितीत गृहकर्ज घेण्यापासूनही ते मागे हटत नाहीत.

डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-३)

एखाद्या योजनेला, ऑफरला हुरळून जावून एखादी मालमत्ता खरेदी केली आणि त्याचे बजेट जर आवाक्‍याबाहेर असेल तर अशावेळी आपली स्थिती शोचनिय होते.

– अपर्णा देवकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)